प्रात:काळी श्री शनिदेव पूजेची काकड आरती Shri Shanidev Kaakad Aarti

Advertisement

ॐ नमो आदि रुपा ओंकार स्वरूपा .. विश्र्वाचिया रुपा पांडुरंगा…
तुझीया सत्तेने तुझे गुण गावो … तेणे सुखी राहो सर्वकाळ..
तुचीया श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन… सर्व होवोनी जाणे तुझे हाती…
तुका म्हणे येथे नाही मी पण …करावे श्रवण कोण लागी…
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा … माझिया सकळा हरीच्या दासा…
कल्पनेची बाधा न हो कदा काळी … संत मंडळी सुखी…
अहंकाराचा वारा न लागो राजसा….. माझ्या विष्णुदासा भाविकासी….
नामा म्हणे तया असावे कल्याण …. तया मुखी निधान पांडुरंगा….

तुझे रूप वेळोवेळा पडो माझे दोन्ही डोळा
राम नाम जपो आणि हरी कथा पडो कानी
पायी तीर्थ यात्रा घडो देह संता घरी पडो
सर्वकाळ देव पूजा नमन माझे गुरुध्वजा
तुका म्हणे अहो देवा घडो वैष्णवाची सेवा
आस हि तुझी फार लागली…. दे दया तिधे दृष्टी चांगली….
देऊ तू नको दृष्ट वासना…. तूची आवडे आमच्या मना….
वागवया सर्व सुर्ष्टीला …. शक्तिवान असे एक चांगला….
सर्व शक्ती तू सर्व देखाना…. कोण जाणतो तुझीया गुणा….
माणसे आम्ही सर्व लेकरे …. मायबाप तू असे खरे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *