श्री स्वामी समर्थ प्रार्थना – Shree Swami Samartha Prarthna

628

Advertisement

॥ श्री स्वामी समर्थ ॥

सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।।

निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊ
हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥

Advertisement

उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ ॥

कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसा राहू
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥

अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू
निरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू ॥

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.