Sairat Movie Songs Lyrics, Videos. Sairat Movie directed by Nagraj Manjule. Movie Album composed by Ajay-Atul and Lyrics penned by Ajay-Atul and Nagraj Manjule. Enjoy this beautiful album on Zee Music Marathi.
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
Sairat Movie Details:
Movie: Sairat (2016)
Producer: Nitin Keni, Nikhil Sane, Nagraj Manjule
Director: Nagraj Manjule
Star Cast: Rinku Rajguru, Akash Thosar, Tanaji Galgunde, Arbaz Shaikh
Music: Ajay-Atul
Lyrics: Ajay-Atul and Nagraj Manjule
Singers: Ajay-Atul, Chinmayi Sripada, Shreya Ghoshal,
Music Label: Zee Music Marathi
Release Date: 29 April 2016
आत्ताच बया का बावरलं Aatach Baya Ka Baavarla Lyrics
हळद पिवळी पोर कवळी, जपुन लावा गाली
सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली
गजर झाला दारी, साजनाची स्वारी
साजनाची स्वारी आली लाज गाली आली
जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाइ झुरलं
उधळलं ग सम्दं बाई हातात न्हाइ उरलं
जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं
किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं
आत्ताच बया का बावरलं
खरचं बया का घाबरलं..
साद तू घातली, रानं पेटून आली
कावरीबावरी लाज दाटून आली
पाहिलं गुमान बाई, घेतलं दमानं बाई
चेतलं तुफान साजना
बेभान झाले साजना
नजरंला नजरंच, नजरंनं कळलं
मन इवलं इरघळलं
अन् नातं जुळलं
आताच बया का बावरलं
खरच बया का घाबरलं..
मन झालं धुंद, बाजिंद, ललकारी ग
पिरतीचा गंध, आनंद, नवलाई ग
लागली ओढ, मन हे लई द्वाड
सतवून झालं सम्दंच ग्वाड
लागलं सजनीला सजनाच याड
झालीया भूल ही उमजली या मनाला
परतुनी घाव हा लागला रं जीवाला
डोळं झाकलेलं बाई, रेघ आखलेलं बाई
माग रोखल्यालं साजना
उधळुनी गेलं साजना
हरलंया पीरमाला, पीरमानं जिकलं
झगडुनी मन माझं अदबीनं झुकलं
साजना तू सावरलं..
Music: Ajay-Atul
Lyrics: Ajay-Atul
Singer: Shreya Ghoshal
Music on: Zee Music Marathi
सैराट झालं जी Sairat Jhala Ji Lyrics
अलगुज वाजं नभात
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहिलीच तरनी ही लाज
अगं झनानलं काळजामंदी
अन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी
बदलून गेलंया सारं
पिरतीचं सुटलंया वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरु न्यारं
आलं मनातलं ह्या व्हटामंदी
अन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी
कवळ्यापनात ह्या
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या,
भरलं तुझं गाणं मनामंदी
घुमतयं कानामंदी
सूर सनईचं राया, सजलं
सजलं, ऊनवारं नभतारं सजलं
रंगलं, मन हळदीनं रानी रंगलं
सरलं, हे जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं, नजरंनं इश जहरी भिनलं
अगं धडाडलं ह्या नभामंदी
अन् ढोलासंगं गात आलं जी
सैराट झालं जी
आकरीत घडलंया
सपान हे पडलंया
गळ्यामंदी सजलंया, डोरलं
साताजल्माचं नात
रुजलंया काळजात
तुला रं देवागतं, पुजलं
रुजलं, बीज पिरतीचं सजनी रुजलं
भिजलं, मन पिरमानं पुरतं भिजलं
सरलं, मन मारून जगनं सरलं
हरलं, ह्या पिरमाला समदं हरलं
अगं कडाडलं पावसामंदी
अन् आभाळाला याद आलं जी..
Music: Ajay-Atul
Lyrics: Ajay-Atul, Nagraj Manjule
Singer: Ajay Gogavale, Chinmayee Sripada
Music on: Zee Music Marathi
याडं लागलं Yad Lagla Lyrics
याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलं तुझ्यात याडं लागलं गं
वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाचं मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं
सांगवंना, बोलवंना, मन झुरतया दुरून
पळतंया कळतंया, वळतयं मागं फिरून
सजलं गं, धजलं गं, लाज काजला सारलं
येंधळं हे गोंधळलं लाडं लाडं गेलं हरून
भाळलं असं उरांत पळवाया लागलं
ओढ लागली मनात चाळवाया लागलं
सुलगंना, उलगंना, जाळ आतल्या आतला
दुखनं हे देखनं गं एकलच हाय साथीला
काजळीला उजळलं पाजळुन ह्या वातीला
चांदणीला आवतान धाडतुया रोज रातीला
झोप लागना सपान जागवाया लागलं
पाखरू कसं आभाळ पांघराया लागलं
Music: Ajay-Atul
Lyrics: Ajay-Atul
Singer: Ajay Gogavale
Music on: Zee Music Marathi
झिंगाट Zingaat Lyrics
उरात होतंय धड धड लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं
हात भरून आलोया, लई दुरून आलोया
आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया
आगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई
आता तराट झालुया तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया
आगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
Music: Ajay-Atul
Lyrics: Ajay-Atul
Singer: Ajay Gogavale, Atul Gogavale
Music on: Zee Music Marathi