मला हे दत्तगुरु दिसले Mala He Dattaguru Disle Lyrics

मला हे दत्तगुरु दिसले Mala He Dattaguru Disle Lyrics

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरु दिसले

माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान विचारी, पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्याभवती औदुंबर वसले

close