Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
मायबापा विठ्ठला Maay Baapa Vithala Lyrics
तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
घरातच कारावास सोसला रं रातंदीस,
तुझा मानुनिया कौल नाही ओलांडली येस…
गोड लागंना शिवार गोड लागंना रं शेत,
चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत,
तुझ्या नावावीण नसे काही ठाव विठ्ठला,
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
युगे अठ्ठावीस होती तुझी वारी ही अखंड,
काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड,
कर सावट हे दूर जनामना दे उभारी,
यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी,
कसा भरलासा रागे आता पाव विठ्ठला,
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
बघ जरा माऊली गं तुझ्या बाळांची आबाळ,
तुझ्या विटे खाली देवा माझी पुरलीया नाळ…
साहवेना गा विठाई दहा दिशांचा तुरुंग,
वाळवंटी वाटभर पुन्हा घुमू दे मृदुंग…
थांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन
सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन..
आता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो,
बघ तुझा जनार्दन आता जनांत वसतो..
तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ ?
सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त
दवाखान्यांतून करी कोण धावाधाव खास…
कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास…?
लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून
की हे काळाचे सावट जावे निघून लांबून…
पिला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा,
कलीकाळाचे संकट कसे निवारतो पहा…
पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन…
साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन…
सारे निवारून मग पंढरीस मी जाईन…
बाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन….
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…
Audio Credits :
Singer: Ajay Gogawale
Voice Over: Atul Gogawale
Music: Nitin-Prasad
Lyrics: Mukund Bhalerao
Music Arrangements And Flute: Ankush A. Boradkar
Rhythm Arranger: Sachin Bhangre
Rhythm Player: Sachin Bhangre, Vishal Khot, Karan Patil, Ratnadeep Jamsandekar, Tushar Rankhambe, Karan Kadam, Rasik Thakur
Chorus: Prasad Shinde, Gopal Thakre, Nitin Ugalmugale, Ankush A.Bordkar, Mukund Bhalerao
Vocals Recorded By: Pramod Chandorkar at Soundideaz Studio
Rhythm Recorded By: Avdhoot Wadkar at Ajivasan Sounds
Mix and Mastered By: Vijay Dayal at Yashraj Studios