Classmates (2015) | Saang Naa Lyrics | Tutatana Tutato ha jeev ka

Song: Saang naa lyrics
Movie: Classmates
Music: Troy – Arif
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer: Shekhar Ravjiani

 

तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
निघताना अडतो पाय का
संपले जरी सारे तरी, आस कोणती माझ्या उरी
सरताना सरते ही वेळ का सांग ना
तुटताना तुटतो हा जीव काहरलेले श्वास हे, चुकलेली पावले
मन मागे ओढते, अडखळते अन पडते का
माझे सारे जिथे, काही नाही तिथे
मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का
नसताना असतो हा भास का सांग नास्वप्ने विरली आता, जो तो झाला रिता
त्या दिवसांची हवा दरवळते अन छळते का
क्षण हे जाळिती, राती आता सुन्या
तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का
मिटताना मिटतो काळोख का सांग ना
तुटताना तुटतो हा जीव हा

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *