Ashi Kashi Vedi Maya Lyrics from Dhyanimani, Composed by Ajit Parab and Lyrics penned by Sandeep Khare, Sung by Madhura Datar & Ajit Parab.
Music: Ajit Parab
Lyrics: Sandeep Khare
Singer: Madhura Datar & Ajit Parab
Music Label: T-Series
अशी कशी वेडी माया
तिला क्षितिजच नसे
आहे-नाहीच्या पल्याड
तिला वेगळेच दिसे
वेड्या मायेच्या छातीत
वेडा पाझरतो पान्हा
एका एका श्वासामध्ये
खोल हाकारतो कान्हा
कधी आसवांचे देणे
कधी रक्ताचे उसासे
आहे-नाहीच्या पल्याड
तिला वेगळेच दिसे
लागे नजरेला लळा
राही खिळूनिया अशी
जरा बोबड्या बोलाशी
जरा पळत्या पायाशी
काय लागला हा लळा
कसे लागले हे पिसे
आहे-नाहीच्या पल्याड
तिला वेगळेच दिसे
Have you read or suggested the above Lyrics to your friends and family? Please let us know in the comments section.