Mazi Story Lovestory Song from Marathi movie Girlfriend, directed by Upendra Sidhaye. Lovestory song features Amey Wagh & Sai Tamhankar. Starring Amey Wagh, Sai Tamhankar,Rasika Sunil, Isha Keskar, Kavita Lad Medhekar, Yateen Karyekar, Suyog Gorhe, Uday Nene, Sagar Deshmukh
Movie: Girlfriend
Music: Hrishikesh – Saurabh – Jasraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer(s): Jasraj Joshi, Shruti Athavale
Music on: Video Palace
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
Lovestory Song Lyrics / Mazi Story Lyrics
गार गार थिएटरात इंटरवल झाली
तिथेच आपल्या स्टोरीचा पहिला सीन आला
पॉपकॉर्न च्या गर्दीत झाली अशी धडक
डोळ्यांमधून काळजात घुसली तडक
हसून मला म्हणाली would you like a bite?
मनात म्हणालो वेडे हे तर..
हे तर love at first sight
माझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी
पॉम पॉम पॉम
हे शिवनेरीच्या स्टॉप वर दुपारचं ऊन
त्यात ती दिसली अन गेलो गारठून
आली माझ्या नशिबात तिच्या शेजारचीच सीट
अचानक ओळखल्याची मी acting केली नीट
अरे तू!
ला ला ला ला
खांद्यावर डोकं आलं मन झालं मोरपीस
मनातल्या मनात दिला हळूच पहिला किस
फूड मॉल आला तेव्हा उठून हसली स्वीट
म्हणाली माझ्यासाठी कॉफी आणतोस प्लीज
थँक्यू म्हणत प्रेमानं धरला माझा हात
एक सेल्फी घेतला वाटलं झाली सुरुवात
माझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी पॉम पॉम पॉम
मग या कहाणीत एक ट्विस्ट आला उतरल्यावर एक भुरट्या पर्स घेऊन पळाला
हू आता मी झालो बच्चन केला पाठलाग
सोडवली पर्स अन अडकलो काळजात
त्या काळजाचा स्क्रीन खाली पडून फुटला
जेव्हा तिचा बॉयफ्रेंड मला आपणहून भेटला
त्याच्या बायसेप एवढी होती माझी कम्बर
मनात केलं मी ब्लॉक पण शेअर केला नंबर
मग transition
सुदैवाने बॉयफ्रेंड निघाला possessive
ती म्हणे तो aggressive
पण आपण खेळत राहिलो defensive
Possessive, aggressive, defensive
हळूहळू शेअरिंग झालं ओह्ह हो हो
शेअरिंग चं केअरिंग झालं आह्ह हा हा
केअरिंग चं डेअरिंग झालं हम्मम्म
आणि मग डेअरिंग चं आणि मग डेअरिंग चं
मला वाटलं आता होईल खरी सुरुवात
तेवढ्यात तिला ऑफर आली मोठी परदेशात
विचारलंही नाही तिनं घेतला डिसीजन
मग मीही म्हटलं नको व्हायला आपण दुसरा option
ती गेली निघून
कायमची ताटातूट
Sad song violins सगळं एकसाथ
दाढी वाढली जास्त डोळे खोल गेले आत
अनेक दिवस आठवणीत पिक्चर पाहिले जाऊन
पॉपकॉर्न च्या काउंटरपाशी पाहील उभं राहून
मग चौदा फेब्रुवारी!
हॅपी बड्डे माझा!
Exactly बारा वाजता मेसेज आला तिचा
राहवत नाही सतत विचार तुझा
तुझ्याविना वेळ जात नाही माझा
तुझं हसणं हवंय तुझं रुसणं हवंय
तू नसलास तरी एकमेकांचं असणं हवंय
नुस्ता टेक्स्ट वाचूनही डोळ्यातून पाणी आलं
मग इंटरनॅशनल कॉल्स चं मोठं बिल आलं
अरे गाढवांनो इथे झाली complete
आमची स्टोरी ट्विस्ट वाली turn वाली लव स्टोरी
ह्यांची स्टोरी कित्ती भारी हिट वाली लव स्टोरी