Swarajya Rakshak Sambhaji Title Song lyrics is New TV Serial on Zee Marathi. Starring Dr. Amol Kolhe, Pratiksha Lonkar, Poorva Gokhale. Composed by Satyajeet Ranade, lyrics by Nachiket Jog and sung by Sandeep Ubale.
TV Serial: Swarajya Rakshak Sambhaji (2017)
Music by: Satyajeet Ranade
Lyrics by: Nachiket Jog
Singer(s): Sandeep Ubale
Music Label: Zee Marathi
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics
श्री शंभोः शिवजातस्य,मुद्रा द्यौरिव राजते
यदंकसेविनो लेखा, वर्तते कस्य नोपरि
प्रसाद होऊनी, भवानी आईचा पुरंदरी
जणू प्रचंड दुर्ग जन्मला
दऱ्या, नभामधून, सप्त सागरामधून
घोष शंभू शंभू येऊ लागला
कणखर तरी हळवा, शिवबासमान भासतो
मायभूमी ध्यास, श्वास भगव्यासी मानतो
धर्मशील शौर्यपती, आसनास छत्रपती
केसरी अतुल्य शोभतो
छावा शिवबाचा छावा
धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत
श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत
सुशास्त्र-नीती-कीर्तिमंत, शौर्यवंत, राजसी,
कुशाग्र बुद्धिवंत शोभला
प्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या
पुनश्च तेज:सूर्य लाभला
छावा शिवबाचा छावा
केली अशी करणी, तडकली धरणी
काळ गेला शरणी, मुजरा तुझ्या चरणी
शंभूराजा मुजरा तुझ्या चरणी….!!
राजे हर संभाजी .. रं हा जी|
राजे हर संभाजी .. रं हा जी|
Yesubaicha Ukhana
पहिले कंकण हे सौभाग्याचे
विसरते दिवस बालपणाचे
दुसरे कंकण आनंदाचे
लज्जेचे आणि विनयाचे
तिसरे कंकण हाथ शोभतो
सौख्याचा राजगड खुलतो
चौथे कंकण कंकणाची शोभा विलसे
सासर करे आपलेसे
पाचव्या कंकणी प्रभा मंगलतेची
वाढवेन कीर्ती दोन्ही कुलांची
सहावे कंकण किणकिणते हाती
बहिणी समान नणंद असती
सातव्या कंकणी सात सासवा घरी
जीवन होई हो भरजरी
आठवे कंकण हे सौभाग्याचे
शंभू राजे युवराज स्वराज्याचे
नऊ कंकणांनी भरला सौभाग्याचा चुडा
शिवरायांनी उघडला सौख्याचा पुडा
रयतेवर आहे जिजाऊंची अखंड सावली
शंभूराजेंना जन्म देणारी धन्य ती माऊली