Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
गणेश श्लोक / गणपती श्लोक
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा |
श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते.
गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे
प्राणप्रतिष्ठा पूजा
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.(उदा. शमी ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या विकारांवर शमीच्या पाल्याचा रस, जिरे आणि खडीसाखर एकत्र करून देतात.धोत-याची झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत-याच्या पानांची धुरी देतात. सुजेवर धोत-याचा रस लावतात.मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात.
’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।
श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वजर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.
Ganpati Bappa Morya : गणपती बाप्पा च्या सर्व आरत्या व आरती नंतर म्हंटले जाणारे सर्व मंत्र, मंत्र पुष्पांजली, स्तोत्र, कर्पूर आरती, घालीन लोटांगण खाली दिलेले आहेत . आपल्या घरी गणपती बाप्पा आल्यावर आपण रोज वेगवेगळ्या आरत्या म्हणतो आणि आरती नंतर कर्पूर आरती म्हंटली जाते नंतर मंत्र पुष्पांजली . आपण गणेशा साठी नवीन नवीन प्रकारचे पदार्थ बनवतो आणि आरती नंतर नैवेद्य दाखवतो.
Ganpati Aarti Sangrah
- सुखकर्ता दुखहर्ता Sukhakarta Dukhaharta Aarati
- जय गणेश जय गणेश / Jay Ganesh Jay Ganesh Aarti
- शेंदूर लाल चढायो Shendur Laal Chadhayo Aarati
- नाना परिमळ दुर्वा Nana Parimal Durva Aarti
- उठा उठा हो सकळीक Utha Utha Ho Saklik
- कर्पूरगौर Karpur Aarti
- जय देवा Jai Deva
- वाहू सुमने तव पद कमली Mantra Pushpanjali
Stotra / Mantra / Chalisa / Ganesh Vrat Maahiti
- श्री गणपतीस्तोत्र – Shri Ganpati Stotra
- श्रीगणेशव्रतांची माहिती Shri Ganesh Vrat
- विनायक चतुर्थी व्रत Shri Vinayak Chaturthi Vrat
- गणाध्यक्ष पहिला Ganadhyaksh Pahila
- वाहू सुमने तव पद कमली Mantra Pushpanjali