Welcome to Marathi Stories section of Lyricskatta.com. Here you will read the best stories for childrens. Akbar Birbal stories are best to learn and enjoy.’
मराठी छान छान गोष्टी – Marathi Chhan Chhan Goshti Part 2
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
रानटी व गावठी हंस – Ranati va Gavathi Hans
एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले. जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे. त्या कळपातील हंसांना या गावठी हंसांशी मैत्री करण्यास पाहिल्याने संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले. एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले. ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.
तात्पर्य
– जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाउन राहणे मूर्खपणा होय.
कोल्हा आणि लांडगा – Kolha aani Landaga
एक कोल्हा एकदा एका लांडग्याला म्हणाला, ‘मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही. एखादा म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला निर्वाह करावा लागतो. त्यामुळे मी अगदी कंटाळल्यासारखा झालो आहे. शिवाय भक्ष्य मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचित येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गावठाणात लपतछपत फिरावं लागतं. तुझं तसं नाही. तू आपलं भक्ष्य रानात; कुरणात मिळवू शकतोस. ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल. तुझ्या हाताखाली शिक्षणासाठी राहिल्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मारून खाण्याचा मान मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. तू मला शिकवलंस तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ तुझ्यावर नक्कीच येणार नाही.’ लांडगा म्हणाला, ‘ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. प्रथम तू पलिकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांघरून ये.’ तसं करताच लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकवले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे, मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे, एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले. सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेना. पण तो मुळातच हुषार असल्याने ते सगले तो लवकरच व्यवस्थित करू लागला. त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले, शेवटी एक मोठा मेंढ्यांचा कळप कोल्ह्याला दिसताच त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या, धनगर व त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडवून दिली. त्याने एक मोठी मेंढी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्याचा आवाज ऐकू आला. तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेषाचे त्याला भान राहिले नाही व त्याने ते लांडग्याचे कातडे फेकून दिले व गुरूचा निरोपही न घेता तो तडक त्या कोंबड्याकडे धावला.
तात्पर्य
– मूळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही.
आजारी गाढवी व भुकेले लांडगे -Aajari Gadhav va Bhukele Landage
एक गाढवी फार दिवस आजारी पडली होती. ती आता मरेल अशी बातमी पसरली. ती बातमी ऐकून काही लांडगे त्या गाढवीच्या समाचारास आले व लांबूनच विचारू लागले, ‘बाईंची प्रकृती कशी आहे ?’ हा प्रश्न ऐकून गाढवीजवळील तिचा मुलगा त्यांच्याकडे येऊन म्हणाला, ‘अहो, बाईंची प्रकृती अशी व्हावी जशी तुमची इच्छा आहे, तशी ती अद्याप झाली नाही.’
तात्पर्य
– आजारी माणसाच्या समाचारास बरेचजण येतात. पण त्यात स्वार्थासाठीच फार जण येतात.
जीभ – Jeebh
ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वैपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !’
रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’
इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’
दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.
तात्पर्य
– कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.
पावसाचा थेंब – Pavasacha Themb
ढगातून गळून पडलेल्या एका पावसाच्या थेंबाने आपल्या नशीबाविषयी जोरात कुरकुर केली. तो म्हणाला, ‘माझं जीवन किती निरुपयोगी आहे. आता माझा अंत होणार ! मी कोणालाही माहीत नाही, मी काही केलं नाही. मला आकाशातून हाकलून दिलं आहे. मी मुळी जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं ?’ तो थेंब नशिबाने एका शिंपल्यात पडला व लगेच ते शिंपले मिटले. पुढे कित्येक वर्षांनी त्या शिंपल्यातून एक अति मौल्यवान मोती निघाला व पावसाच्या थेंबाचा बादशहाच्या मुकुटात शोभणारा मोती बनला.
तात्पर्य
– हलक्या कुळात जन्म घेतलेला माणूस स्वतःच्या तेजाने मोठेपणा मिळवतो.
जे होतं ते चांगल्यासाठीच – Je Hote Te Changalyasathich
एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबर चा अंगठा कापला जातो… अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो… तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून… शहरात पाठवतो… तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ”महाराज…शांत व्हा…जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…” अकबर ला राग येतो…तो जास्तच चिडतो…आणि शिकयांना सांगतो ” जा बिरबल ला घेऊन जा…रात्रभर उलटं टांगून ठेवा….आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ” सर्व शिपाई तिथून निघून जातात….अकबर एकटाच जंगलात असतो….तो एकटाच पुढे शिकार करायला जातो…!! पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात.. अकबर ची बळी ते देणार असतात…त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात…तितक्यात एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,” हा अशुद्ध आहे…आपण याची बळी नाही देऊशकत… याचा अंगठा तुटलेला आहे…” आदिवासी अकबर ला सोडून देतात…आणि त्याला बिरबल चं बोलणं आठवतं,’ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..’ तो धावत पळत त्याच्या महलात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो….आणि म्हणतो, ” मला माफ कर….तुझ्यामुळे मी वाचलो…आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली….” बिरबल हसतो आणि म्हणतो, ”नाही महाराज….जे होते ते चांगल्यासाठीच होता…” अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं…तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला…चांगलं कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, ” महाराज…मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता…..म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…. ”
तात्पर्य-
मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!
बोलून-चालून गाढवच! – Bolun Chalun Gadhavach!
बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुक्की आली, ती तो मधूनच तंबाखूची चिमूट तोंडात टाकून बराच वेळ ती चघळत असे.
एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सांयकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले. त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालले असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा वास घेई आणि न खाताच पुढे निघून जाई. असे त्याने दोन-चार वेळा केले, बिरबलाला टोमणा देण्याच्या हेतूने बादशहा म्हणाला, ”बिरबल, बघितलंस ना? तो गाढवसुद्धा तंबाखूला तोंड लावीत नाही.”
तेव्हा बिरबल म्हणाला, ”महाराज, अहो ते बोलून-चालून गाढवच. त्याला तंबाखू खाण्याची मजा काय कळणार?”
बिरबलाने आपल्याला फिरवून टोमणा मारल्याचे पाहून बादशहा फारच केविलवाणा झाला.
कंजूस माणूस – Kanjus Manus
एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला .त्याने आपल्या सर्व कविता गावून दाखविल्या कवीला वाटले आपलेला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता .तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता एकूण मी फारच खुश झालो आहे .उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले परंतु परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला .परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याच नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन अस म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही .मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हगिगत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली .तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला.
परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का? त्यावर बिरबल म्हणाला आपलेला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला
स्वप्न – Swapna
एकदा अकबर बादशहाचा दरबार भरलेला असतो. तेथे बिरबल सुद्द्धा असतो. तेव्हा अकबर बादशहा सर्व दरबारातील लोकांना त्याला पडलेले स्वप्न सांगतो.
अकबर बादशहा म्हणतो : मला आज रात्री स्वप्न पडले की, ” मी एका मधाच्या डबक्यात पडलेलो, आणि बिरबल एका चिखलाच्या डबक्यात पडलेला होता. ”
त्यावर बिरबल म्हणतो : ”बादशहा मला हि असेच स्वप्न पडलेले होते, पण त्यात तुम्ही मला आणि मी तुम्हाला चाटत होतो.”
त्या नंतर कधी बादशहाने बिरबलची थट्टा-मस्करी केली नाही.