श्री हरतालिकेची आरती | Shri Hartalikechi Aarti
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥
हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥
रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥
तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने ।
केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥
काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥
Haritalikesi Mangal Aarati Gau
हरितालिकेसी मंगल आरती गाऊ
सौभाग्य व्रता ते सेवू
हरितालिकेसी मंगल आरती गाऊ
चौरंग जडित मांडियला
कर्दळी लाविल्या त्याला
वरी सांब वाळूचा केला
सखी सह मग पार्वती बसवू
घेऊनी निरांजन ताटी
उजळूनी दिव्यांच्या वाती
सद्भावे गाऊ तिज आरती
नैवेद्य तिला मग दावू
बहुखेळ खेळू निशी होता
तोषवू हिमालय दुहिता
करू स्नान पहाटचि होता
विप्रांस वायने देऊ