• Uncategorized

आली दिवाळी दिवाळी Aali Diwali Diwali Lyrics

लावितें मी निरांजन तुळशीच्या पायापाशी।
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥
आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी।
घरोघरी जागविते माय मुलें झोपलेली॥
घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण।
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण॥
चार वरसांमागे होता हात तुझा अंगावरी।
कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी॥
आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा।
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा॥
तुझ्यामागुती बाबांनी दुःख दाखविले नाही।
त्यांच्या पंखात वाढलो तुझा भाऊ आणि ताई॥
तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते।
आणि दिवाळीच्या दिशीं तुझी आठवण येते॥
सासरीच्या या संसारीं माहेराची आठवण।
आठवती बाबा-भाऊ आणि दारीचं अंगण॥
अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी।
दारी घालिते रांगोळी माझ्यावाचून का कोणी॥
आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन।
जिथे उभे अंगणांत तुळशीचें वृंदावन॥
दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा।
कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा॥
शेजारच्या घरातली दळणाची घरघर।
अजूनही येती कानी आठवणींतून स्वर॥
आमच्या ग दारावरनं घोड्यांच्या गाड्या गेल्या।
भावांनी बहिणी नेल्या बीजेसाठी॥

You may also like...