Asambhav Title Song Lyrics from Zee Marathi TV Serial.
मालिका : असंभव
संगीतकार : स्वप्नील बांदोडकर
गीतकार : गुरु ठाकूर, मधुकर जोशी
गायक/गायिका : स्वप्नील बांदोडकर
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:॥
दिवसामागून रात्र धावते सकाळ-संध्याकाळ
सूत्रधार जो या सार्याचा नाव तयाचे काळ
काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा
क्षणांत होते संभव सारे क्षणापूर्वीचे, असंभव!