अनादि मी अनंत मी Anadi mi Anant mi

Music: Sudhir Phadke
Lyrics: SWATANTRYAVEER SAVARKAR
Singer(s): Sudhir Phadke

Anadi mi Anant mi

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ॥

अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळाऽ रिपूऽ । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ॥


लोटि हिंस्त्र सिंहाच्या पंजरीं मला
नम्र दाससम चाटिल मम पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाऽहलाऽ । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ! ॥